 |
|
बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन, मर्यादित. मुंबई |
Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai |
 |
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७) |
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, चिरागनगर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६ |
दूरध्वनी : २५१५ ००९१ / २५१५ ००९२ / २५१५ ००९३
फॅक्स : २५१५ ००९४ |
|
 |
|
|
|
|
 |
फेडरेशनच्या संदर्भात माहिती |
|
क. निधी |
|
क.१.१ निधी उभारण्याचे मार्ग : |
|
फेडरेशनचे निधी खाली दिलेल्या मार्गांनी उभारले जातील.
१) भाग-भांडवल (२) प्रवेश शुल्क (३) वर्गणी (४) देणग्या (५) अनुदान (६) जाहिराती (७) मासिक, माहिती पुस्तके इत्यादीद्वारे (८) वेळोवेळी ठरविलेल्या इतर अन्य कायदेशीर वर्गणी. |
|
क.१.२ फेडरेशनचे अधिकृत भाग भांडवल |
|
फेडरेशनचे अधिकृत भाग भांडवल रुपये २५,००,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस लाख फक्त) असेल. प्रत्येक भागार्च दर्शनी किंमत रु. १००/- राहील. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम २८ मधील तरतुदीस अधीन राहून एका सभासदास जास्तीत जास्त शंभर भाग धारण करता येतील. |
|
क.१.३ प्रत्येक सभासदाने अंशदान केलेल्या भागाचा दाखला फेडरेशनने त्याचे भाग मंजूर केल्यापासून तीन महिन्याच्या आत त्या सभासदास, भिन्न अनुक्रमांक असलेले, सभासदाचे नांव दर्शविणारे, भागांची संख्या व रक्कम दर्शविणारे भाग पत्र देण्यात येईल. प्रत्येक भाग पत्रावर संस्थेच्या नावाचा शिक्का (सील) उठविण्यात येईल. त्यावर संघाचे अध्यक्ष, मानद सचिव व व्यवस्थापक समितीने रितसर अधिकार दिलेल्या अधिकार दिलेल्या संचालक मंडळाचा समिती सदस्य, यांच्या सह्या असतील. |
|
|
|
|
 |
|
|
|
|