फेडरेशनच्या संदर्भात माहिती |
|
ड. सभासदत्व |
|
ड.१.७ सभासदत्व बंद होणे |
|
सभासदत्व खालील कारणाने संपुष्टात येईल. |
- सभासद पतसंस्था सभासदाने राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर झाल्यास.
- सभासद पतसंस्था सभासदाचे सर्व भाग हस्तांतरण केल्यास.
- उपविधी क्र.ड.१.१ च्या तरतुदीचा भंग झाल्यास.
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ३५ व त्या खलील नियम २८ व २९ यातील तरतुदीनुसार काढून टाकल्यास.
- सभासद पतसंस्था विसर्जित झाल्यास/संस्था नोंदणी पत्ता बृहन्मुंबई बाहेरील मंजूर झाल्यास.
- सर्वसाधारण सभेने सभासदत्व रद्द केल्यास.
|
|
ड.१.८ सभासदत्वाचा राजीनामा |
|
सभासद पतसंस्था आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन स्वतचे भाग भांडवल संचालक मंडळाचे संमतीने परत घेऊ शकेल. मात्र असे करण्यापूर्वी त्याचेकडे येणे असलेल्या रकमांची पुर्नफेड झाली असावी. अशा प्रयोजनासाठी वित्तीय वर्षात संस्थेने परत केलेल्या भाग भांडवलाची एकूण रक्कम ही लगत पूर्वीच्या वित्तीय वर्षात शेवटच्या दिवशी संघाचे भरणा झालेले भाग भांडवल असेल याच्या दहा टक्के रक्कमेपेक्षा अधिक असणार नाही. तसेच सभासदत्वाचा राजीनामा दिल्यानंतर तीन वर्षांपर्यंत पुन्हा सभासदत्व देता येणार नाही. |
|
ड.१.९ सभासदाची हकालपट्टी |
|
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ३५ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २८ व २९ च्या तरतुदीस अधीन राहून, सभासदाची खालील कारणास्तव हकालपट्टी करण्यात येईल : |
- ती सतत वर्गणी थकबाकीदार असल्यास.
- त्याने जाणूनबुजून संस्थेस फसविले असल्यास.
- ती दिवाळखोर अथवा कायद्याने अपात्र ठरल्यास.
- त्याने फेडरेशनच्या हितास व हितसंबंधास तसेच व्यवस्थित चालणाऱया कामास व प्रतिष्ठेस बाधा आणणारी कृत्य केल्यास.
- सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या नियम ४५ च्या तरतुदीच्या विरुद्ध वर्तन केल्यास, काढून टाकलेल्या सभासदाचे धारण केलेले भाग जप्त करण्यास पात्र राहतील.
|
|
ड. १.१० हकालपट्टी केलेल्या सभासदास पुन्हा प्रवेश |
|
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ३५ (२) च्या तरतुदींना अधीन राहून हकालपट्टी केलेल्या सदस्यास पुन्हा सभासद म्हणून दाखल करुन घेता येईल. |
|
ड.१.११ सभासदाची जबाबदारी |
|
सभासदांची जबाबदारी महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० चे कलम ३३ च्या तरतुदीस पात्र राहून खालीलप्रमाणे राहील. |
- फेडरेशनच्या सभासदाची जबाबदारी त्याच्या नांवे असलेल्या भागाच्या किंमती इतकी मर्यादित राहील.
- माजी सभासदाच्या बाबतीत त्या तारखेस सभासदत्व संपुष्टात आले असेल त्या तारखेपासून दोन वर्षे मुदतीपर्यंत राहील.
|
|
ड.१.१२ भाग भांडवल, लाभांष व ठेवीवरील संस्थेचा हक्क |
|
सभासदाकडून अगर माजी सभासदाकडून फेडरेशनचे येणे असेल तर, त्यापोटी फेडरेशन सभासदाच्या नांवे असलेल्या भागावर, लाभांषावर व ठेवीवर संघाचा प्रथम अग्रहक्क व बोजा राहील. फेडरेशन केव्हाही सभासदाच्या जबाबदारीपोटी त्यास देय असलेली रक्कम वळती करुन घेईल. |
|
|
|