फेडरेशनच्या संदर्भात माहिती |
|
इ सभा |
इ.१.६ वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा |
- वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीस सभासदाच्या नोंदलेल्या पत्त्यावर संचालक मंडळाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके आणि विषय पत्रिका सभेच्या तारखेच्या १४ दिवस अगोदर पाठविली जाईल. तसेच सभेची नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर लावली जाईल. नोटीसीची एक प्रत निबंधक यांचेकडे सादर करणे बंधनकारक राहील.
- विशेष सर्वसाधारण सभेच्या नोटीशीत मागणी केलेल्या विषयांचा अंतर्भाव करुन सभा बोलविली जाईल. अशा सभेत विषयपत्रिकेवर मागणी केलेलाच विषय राहील. सभासदाचे नोंदलेल्या पत्त्यावर अशी नोटीस सभेच्या तारखेपूर्वी कमीत कमी ७ दिवस अगोदर पाठविली जाईल. तसेच सभेची नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर लावली जाईल.
- कोणत्याही सर्वसाधारण सभेची नोटीस मिळाले नाही हे कारण सभा तहकूब करण्यासाठी अथवा पुढे ढकलण्यासाठी पुरेसे नाही.
- कोणत्याही सर्वसाधारण सभेच्या नोटीसीत सभेची जागा, तारीख व वेळ याचा स्पष्ट उल्लेख असेल. तसेच सदरहू नोटीसीत कोरम अभावी तहकूब झालेलया सभेची जागा, तारीख व वेळ यांचा स्पष्ट उल्लेख असेल.
- वार्षिक सर्वसाधारण/विशेष सर्वसाधारण सभेचे नोटीस मानद सचिव किंवा त्यांच्या गैरहजेरीत स्वत संस्थेचे अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने दिली जाईल.
|
|
इ.१.७ वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष साधारण सभा गणपूर्ती (कोरम) |
|
कोणत्याही सर्वसाधारण सभेस एकूण सभासद संख्येच्या १/५ अगर २५ यापैकी जी संख्या कमी असेल इतके सभासद असले म्हणजे गणपूर्ती झाली असे समजण्यात येईल. |
|
इ.१.८ वार्षिक सर्वसाधारण सभेची तहकूबी आणि विशेष सर्वसाधारण सभा रद्द करणे : |
- जर वार्षिक सर्वसाधारण सभा गणपूर्ती अभावी होऊ शकली नाही तर, नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे अर्ध्या तासासाठी तहकूब केली जाईल. अशी तहकूब केलेली सभा नंतर भरल्यावर सभेच्या मूळ विषय पत्रिकेमध्ये समाविष्ट केलेल्या विषयावर गणपूर्ती (कोरम) असो अगर नसो त्यावर विचार केला जाईल.
- सभासदांच्या लेखी मागणीवरुन बोलविण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा सभेच्या नियोजित वेळेपासून एक तासात गणपूर्ती होऊ शकली नाही तर ती सभा रद्द होईल.
- विषय पत्रिकेवरील विषय वेळेत पूर्ण न झाल्यास नियम ६० नुसार सभा घेता येईल.
- नफा वाटणी मंजूर करणे व लाभांष जाहीर करणे.
|
|
अ.१.९ सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष |
|
संचालक मंडळाचे अध्यक्ष सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष असतील. त्यांचे गैरहजेरीत उपाध्यक्षांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात येईल. आणि दोघांच्या गैरहजेरीत हजर असलेले व मतदानांचा हक्क असलेले सभासद आपल्यापैकी एकाची निवड सभेच्या अध्यक्ष पदासाठी करतील. |
|
इ.१.१० मतदानाचा अधिकार |
- कितीही भाग धारण केले असले तरी प्रत्येक सभासदाला फक्त एकच मत देण्याचा अधिकार राहील.
- सम समान मताचे प्रसंगी अध्यक्षांस सभासद म्हणून असलेल्या मताशिवाय एक निर्णायक मत राहील.
|
|
|
|