Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, चिरागनगर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१ / २५१५ ००९२ / २५१५ ००९३     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
३१ मार्च २०१० अखेर मुंबई शहरातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाची संख्या २९,५२८ इतकी झाली असून दरवर्षी त्यामध्ये मोठ्या संख्येने भर पडत चाललेली आहे. मुंबई शहरातील सहकारी संस्था प्रकारानुसार आकडेवारी खालीलप्रमाणेः
अ.क्र. संस्था प्रकार जि.उ.निबंधक १  जि.उ.निबंधक २ जि.उ.निबंधक ३ एकूण
बँका       ५३ १० ७१
नोकरदार बँका १०
नोकरदार पतसंस्था ४८३ १७४ १२८ ७८५
नागरी सह. पतसंस्था ५९८ ६४२ ६५० १८९०
औद्यो. सह. संस्था १६३ ४६२ २५३ ८७८
मध्य.सह.ग्राहक संस्था ११ ११ २८
प्राथ.सह.ग्राहक संस्था १४७ १७२ १२० ४३९
मजूर सह. संस्था ३४४ १९४ २२२ ७६०
गृहनिर्माण सह. संस्था ३४६३ ४१५६ १३२१५ २०८३४
१० वाहतूक सह. संस्था १२ २१
११ इतर प्रकारच्या सह.संस्था १०५६ १०९२ १६६४ ३८१२
  एकूण ६३३७ ६९१५ १६२७६ २९५२८
महाराष्ट्र राज्यात ३१ मार्च २०१० अखेर २ लाख १८००० सहकारी संस्था नोंदणीकृत असून ५ कोटी ३९ लाख त्यामध्ये सभासद आहेत. व यामध्ये बिगर कृषी पतपुरवठा म्हणजेच नागरी / ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व पगारदार
कर्मचारी सहकारी पतसंस्थांची संख्या 23,839 असून सभासद संख्या 2 कोटी ३९ लाख आहे. पतसंस्थांचा इतर तपशील खालिलप्रमाणेः-
 
तपशील ३१ मार्च रोजी   शेकडा बदल
  २००९ २०१०  
संस्था (संख्या) २४,१६७ २३,८३९ (-) १.४
सभासद (लाख) २२३ २३९ ७.२
ठेवी ५६,७३२ ५९,५९७ ५.१
स्वनिधी १६,४०१ १८,३७१ १२.०
भाग भांडवल    ७,०६८ ८,१९८ १६.०
त्यापैकी, राज्य शासनाचे  १२.५
खेळते भांडवल १,१४,३२९ १,३१,३०७ १४.९
कर्ज वाटप ५२,१९४ ५२,२१९ नगण्य
येणे कर्ज  ४८,७२६ ३७,०२४ (-) २४.०
थकित कर्ज     ७,९९० ८,१३३ १.८
कर्ज वसुली ४४,६६८ ४६,३९१ ३.९
तोट्यातील संस्था (संख्या) ६,१३९ ६,१६० ०.३
तोट्याची रक्कम ४३४ ४८० १०.६
 
बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनची स्थापना ३ जुलै १९८६ रोजी झालेली असून नोंदणी क्रमांक ःबी.ओ.एम./(बी.ओ.एम.)आर.एस.आर./(ए.एन.सी)/१०१/८६-८७)  असा आहे. फेडरेशनचा नोंदणीकृत पत्ता ः ११२, सौरभ बिल्डींग, चिरागनगर घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई - ४०० ०४६. असून फेडरेशनचे कार्यक्षेत्र संपुर्ण बृहन्मुंबईसाठी आहे. त्यामध्ये मुंबई शहर (१), मुंबई पुर्व उपनगरे (२) व पश्चिम उपनगरे (३) या तिन्ही जिल्हयातील सर्व पतसंस्था या फेडरेशनच्या अंतर्गत येतात. आणि संपुर्ण मुंबईसाठी हे एकमेव फेडरेशन आपले कामकाज फेडरेशनचे उपविधी त्यातील ध्येय व उद्दीष्टांप्रमाणे करते. ३१ २०११ अखेर फेडरेशनचे ११८२ सभासद असून त्याचे ध्येय उद्दीष्टांप्रमाणे फेडरेशन नियमीतपणे काम करीत असते. फेडरेशनचा अद्यावत उपविधी  दि. ३१ मार्च २०११ अखेर खालिलप्रमाणे आहे.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved