 |
|
बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन, मर्यादित. मुंबई |
Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai |
 |
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७) |
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, चिरागनगर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६ |
दूरध्वनी : २५१५ ००९१ / २५१५ ००९२ / २५१५ ००९३
फॅक्स : २५१५ ००९४ |
|
 |
|
|
|
|
 |
फेडरेशनच्या संदर्भात माहिती |
|
उपसमित्या |
फ.१.१५ फेडरेशनचे सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक/मानद सचिव यांची कर्तव्ये : |
|
फेडरेशनचे सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक/मानद सचिव हे संचालक मंडळाच्या नियंत्रणाच्या अधीन राहून त्याची खालील कर्तव्ये पार पाडतील. |
- फेडरेशनच्या वतीने सर्व पत्रव्यवहार करणे आणि त्याची सर्व कागदपत्रे व हिशोबाच्या वह्या अद्यावत ठेवणे.
- संचालक मंडळाच्या हुकमान्वये फेडरेशनच्या वतीने रक्कम स्वीकारणे व खर्च करणे आणि रोख रकमेबद्दल जबाबदार राहणे, संचालक मंडळाने वेळोवेळी मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
- संचालक मंडळाने दिलेल्या अधिकारानुसार सर्व कामे करणे व कार्यवाही करणे.
- सहकार विभागाने मागविलेल्या माहित्या मुदतीत सादर करणे.
- सहकार विभागाने मागविलेल्या माहित्या मुदतीत सादर करणे.
- संचालक मंडळाच्या आदेशानुसार कर्मचाऱयांच्या नियुक्त्या करणे.
- कर्मचारी वर्गामध्ये कामाचे वाटप करणे, कामकाज सोपविणे, कामकाजावर देखरेख ठेवणे आणि आवश्यकतेनुसार कर्मचाऱयांच्या बदल्या करणे.
- स्थायी आदेश/सेवा नियमानुसार कर्मचाऱयांवर शिस्तपालनासाठी योग्य ती कारवाई करणे.
- कर्मचारी वर्गाचे रजेचे अर्ज, प्रवास भत्ता बिल, वैद्याकीय बिल व इतर संमत केलेल्या विषयांची बिले मंजूर करणे.
- कायदेशीर कारवाई संबंधी संस्थेचे प्रतिनिधीत्व करणे.
- संचालक मंडळाने सोपविलेली इतर कामे करणे.
- महाराष्ट्र शासन, सहकार खाते, भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड इत्यादीकडून वेळोवेळी निर्गमित झालेले पतसंस्थांच्या बाबतीतील अध्यादेश, आदेश, परिपत्रके मिळविण्यासाठी पत्रव्यवहार करणे, संपर्क साधणे व त्यासाठी योग्य ती दक्षता घेणे.
|
ग नफा वाटणी |
ग.१.१ नफा वाटणी |
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ नुसार संस्थेचा निव्वळ नफा काढला जाईल
- संचालक मंडळाचे शिफारसीनुसार निव्वळ नफ्याची वाटणी सर्वसाधारण सभेत खालीलप्रमाणे करण्यात येईल.
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार नफ्याच्या २५ टक्के पेक्षा कमी नाही इतका नफा वैधानिक राखीव निधीत जमा केला जाईल व त्याची स्वतंत्र गुंतवणूक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत केली जाईल.
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतूदीत नमूद केलेल्या कमाल मर्यादेस पात्र राहून लाभांश देण्यासाठी तरतूद केली जाईल.
- नफा-तोटा हिशोब पत्रकात इमारत निधी, विकास निधी, सेवक कल्याण निधी व धर्मादाय निधी यांची तरतूद करता येतील. (त्याचप्रमाणे निव्वळ नफ्यातून इतर निधीची रक्कम उभारता येईल.)
- फेडरेशनने निव्वळ नफा काढण्यापूर्वी ढोबळ नफ्यातून संशयीत व बुडीत कर्जासाठी तरतूद करावी.
|
|
ग.१.२ राखीव निधी |
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या खालील नियम आणि उपविधी यात नमूद केलेल्या रकमेशिवाय राखीव निधीत, प्रवेश फी, भाग वर्ग करण्याची फी, जप्त केलेल्या भागाची रक्कम, जप्त केलेल्या लाभांशाची रक्कम, या रकमा जप्त केल्या जातील.
- राखीव निधीची गुंतवणूक व विनियोग महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ६६ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम ५४ मधील तरतूदीनुसार करण्यात येईल.
|
|
ग.१.३ लाभांश |
- लाभांशाची रकम ही ज्या सहकारी वर्षाची संबंधित असेल त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सदरहू भाग ज्याचे नावाने संस्थेच्या पुस्तकात असतील त्यांना देण्यात येईल.
- लाभांश जाहीर केल्यानंतर तीन वर्षाच्या आत लाभांशाची रक्कम न घेतल्यास ती रक्कम जप्त करुन राखीव निधीत जमा केली जाईल.
|
|
|
|
|
|
 |
|
|
|
|