 |
| |
| बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन, मर्यादित. मुंबई |
| Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai |
 |
| (नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७) |
| ११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, चिरागनगर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६ |
| दूरध्वनी : २५१५ ००९१ / २५१५ ००९२ / २५१५ ००९३
फॅक्स : २५१५ ००९४ |
|
 |
|
|
|
| |
|
|
 |
| फेडरेशनच्या संदर्भात माहिती |
| |
समित्या |
| (१) कार्यकारी समिती |
|
| या समितीमध्ये फेडरेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य असतील. तसेच आवश्यकता भासल्यास विविध समित्या उपसमित्यांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेता येईल. या समितीची सभा दरमहा घेण्यात येईल व या समितीमध्ये फेडरेशनचे सर्वसाधारणपणे तातडीचे, आवश्यक, धोरणात्मक अशाप्रकारचे कामकाज केले जाईल. या समितीवी संख्या निमंत्रित सदस्य सोडून ११ पेक्षा जास्त असणार नाही. |
|
| (२) शिक्षण - प्रशिक्षण समिती |
|
| या समितीमध्ये फेडरेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य असतील. तसेच आवश्यकता भासल्यास विविध समित्या उपसमित्यांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेता येईल. सर्वसाधारणपणे ही समिती पतसंस्थांना त्यांचे पदाधिकारी संचालक, अधिकारी-कर्मचारी व पतसंस्थांचे सभासद ह्यांना सहकाराचे व प्रामुख्याने पतसंस्थांचे संदर्भात शिक्षण-प्रशिक्षणाचे सर्व कामे अग्रक्रमाने करील. या समितीची संख्या जास्तीत जास्त निमंत्रितांशिवाय ११ पेक्षा जास्त असणार नाही. |
|
| (३) थकबाकी वसुली समिती |
|
| या समितीमध्ये फेडरेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य असतील. तसेच आवश्यकता भासल्यास विविध समित्या उपसमित्यांचे प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेता येईल. सर्वसाधारणपणे ही समिती पतसंस्थांना त्यांचे पदाधिकारी संचालक, अधिकारी-कर्मचारी व पतसंस्थांचे सभासद ह्यांना थकबाकी न होणेसाठी व झालेली थकबाकी वसुल करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व काम अग्रक्रमाने करील. या समितीची सभा दरमहा घेण्यात येईल व या समितीची संख्या जास्तीत जास्त निमंत्रितांशिवाय ११ पेक्षा जास्त असणार नाही. |
| |
|
| |
|
 |
|
| |
| |
|