Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, चिरागनगर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१ / २५१५ ००९२ / २५१५ ००९३     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
  1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या खाली तयार केलेले नियम आणि उपविधी याच्या तरतुदीनुसार उभारलेल्या विविध भिन्न निधीचा विनियोग करणे.
  2. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ५४ व ५५ च्या तरतुदीच्या उपबंधास अधीन राहून संघाच्या निधीची गुंतवणूक करणे.
  3. फेडरेशनची रोख शिल्लक, स्थावर व जंगम मालमत्ता आणि वाहतुकीतील रोख रक्कमेचा विमा उतरविणे व सदर बाबी विमा संरक्षित करणे.
  4. बृहन्मुंबईतील सर्व को-ऑप वार्ड व जिल्हा समित्या नियुक्त करणे. तसेच शिक्षण प्रशिक्षण समिती, थकबाकी वसुली समिती, कार्यकारी समिती व इतर आवश्यक निरनिराळया विषयाकरिता समित्या नेमणे, त्यातील सदस्य संख्या ठरविणे. व त्यांना जरुर ते अधिकार देणे.
  5. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चया नियम १०७ सी मधील अटीस अधीन राहून सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक/हिशोबनीस यांनी ठेवावयाच्या हात शिल्लकीची मर्यादा ठरविणे व संबंधितांवर जबाबदारी सोपविणे.
  6. फेडरेशनकडे आलेल्या रकमा नियमितरित्या बँकेत भरण केल्या जातात किंवा नाही ते पाहणे.
  7. सहकार खात्याचे मागविलेले अहवाल व इतर माहिती वेळेत पाठविण्याची व्यवस्था करणे.
  8. अंतर्गत हिशोब तपासणीसाकडून प्रत्येक तीन महिन्यांची संघाचे हिशोब तपासून घेणे.
  9. फेडरेशनचे कामकाज आवश्यकतेनुसार पदाधिकाऱयांमध्ये वाटून घेणे व त्यासंबंधीची जबाबदारी त्यांचेवर सोपविणे.
  10. समित्या-उपसमित्या यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे व मार्गदर्शन करणे.
  11. फेडरेशनच्या उद्देशपूर्तीसाठी व पतसंस्थांच्या आवश्यकतेनुसार फेडरेशनच्या वॉर्ड/जिल्हा शाखा कार्यालय अस्तित्वात आणणे.
  12. फेडरेशनच्या कामकाजाची धोरणे ठरविणे, साधारणता फेडरेशनच्या कामकाजाबाबत सारासार विचार करणे, जबाबदारीने फेडरेशनच्या हितसंबंधांची जपवणूक करुन निधीच्या सुरक्षिततेची काळजी घेणे. आणि सभासद पतसंस्थांच्या व आम जनतेच्या हितसंबंधांस बाधा न आणता फेडरेशनचा कारभार करणे.
  13. फेडरेशनच्या हिशोब वह्यामंध्ये दाखविलेली रोख रक्कम बाकी १५ दिवसांनी एकदा व फेडरेशनच्या इतर मालमत्ता सहा महिन्यांतून एकदा तरी पडताळून पाहण्यासाठी संचालक मंडळाच्या एका सदस्याला त्याच्या नांवाने अधिकार देणे. या सदस्याने आपल्या कामाचा अहवाल संचालक मंडळाच्या पुढील सभेत सादर करणे. अशा अहवालात जर रोख रक्कम अगर काही मालमत्तेत तूट आल्याचा उल्लेख केला असेल तर तूटीच्या अगर इतर मालमत्तेच्या वसुलीसाठी तत्परतेने कारवाई करणे.
  14. संचालक मंडळाने किंवा कोणत्याही अधिकाऱयाने कामकाज करीत असताना सद्भावनापूर्वक केलेले कोणतेही कृत्य हे फेडरेशनच्या घटनेच्या किंवा संचालक मंडळाच्या रचनेत किंवा अधिकाऱयांच्या नेमणूकीत किंवा निवडणूकीत आढळून आलेल्या काही दोषामुळे किंवा अधिकारी त्या पदासाठी अपात्र होतो. किंवा केवळ या कारणावरुन अवैध्य आहे असे समजता कामा नये.
  15. शासकीय, निमशासकीय महामंडळे इत्यादीच्यांकडून जागा व इमारती कराराने निबंधकाच्या पूर्व परवानगीने खरेदीने, भाडयाने मिळविणे.
  16. वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व खर्चास मान्यता देणे.
  17. कर्मचाऱयांना कायदेशीर कारवाईमध्ये फेडरेशनच्या वतीने भाग घेण्याचा अधिकार देणे.
  18. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन संचालक मंडळाची निवडणूक घेणे व तद्अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे.
 
data pending (फ.1 .12 no 33) to (फ.1 .14)
 
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved